निदास चषक : भारतीय संघाची अंतिम सामन्यात धडक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2018
Total Views |

१७ धावांनी केला बांगलादेशचा पराभव

 

 

कोलंबो :
भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात कोलंबो येथे सुरु असलेल्या निदास चषकाच्या कालच्या सामन्यात भारताने बांगलादेश संघाचा १७ धावांनी पराभव करून स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक घेतली आहे. भारतीय संघाने दिलेल्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, बांगलादेशाला २० षटकांमध्ये फक्त ६ बाद १५९ धावाच करता आल्या. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा या विजयाचा शिल्पकार ठरला असून त्याच्या ८९ धावांच्या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून देखील गौरवण्यात आले आहे.

कोलंबोतील प्रेमदास स्टेडियममध्ये हा सामना खेळवला गेला होता. सामन्याच्या सुरुवातीला बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याक निर्णय घेतला होता. यानंतर खेळण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा याने ८९ धावांची खेळी केली. रोहित बरोबर शिखर धवन (३४), सुरेश रैना (४७), दिनेश कार्तिक याने २ (नाबाद) धावा करत भारताला २० षटकांमध्ये ३ बाद १७६ धावांची मजल मारून दिली. या बदल्यात बांगलादेशकडून एकमेव रुबेल होसीन याला एकट्यालाच भारताचे ३ गडी बाद करता आले.


यानंतर मैदानात आलेल्या बांगलादेश संघाकडून मुशफिकुर रहीम याने ७२ धावांची नाबाद खेळी करत बांगलादेश संघाला विजय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. परंतु रहीम याच्या प्रयत्नाला यश आले नाही. रहीम बरोबर तमिम इकबाल (२७), शब्बीर रेहमान (२७), कर्णधार महमुदुल्ला (११), लितोस दास (७) आणि मेहदी हसन (७) यांनी देखील चांगली कामगिरी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण याचा संघाला काहीही फायदा झाला नाही. परिणामी बांगलादेश संघाचा डाव ६ बाद १५९ धावांवरच संपुष्टात आला.

या विजयासह भारतीय संघाने आता थेट अंतिम सामन्यात धडक घेतली आहे. यानंतर बांगलादेश संघाचा सामना श्रीलंका संघाबरोबर होणार असून बांगलादेश संघाला अंतिम सामन्यात जाण्यासाठी आणखीन एक संधी मिळणार आहे. या सामन्यामध्ये विजयी झालेल्या संघाची अंतिम लढत भारताबरोबर असणार आहे. त्यामुळे श्रीलंका आणि बांगलादेशपैकी कोणता संघ अंतिम सामन्यात जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

भारताचा डाव : 



बांगलादेशाचा डाव : 



@@AUTHORINFO_V1@@