सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी साडेसहाशे कोटींची तरतूद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2018
Total Views |

राज्यात केंद्राच्या धर्तीवर ‘महाराष्ट्र सर्ट’ सुरू होणार

 

 
 
 
मुंबई : राज्यात सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी साडेसहाशे कोटींची तरतूद करण्यात आली असून केंद्राच्या धर्तीवर ‘महाराष्ट्र सर्ट’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यात सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
राज्यात सायबर गुन्हांना आळा घालण्यासाठी शासनातर्फे महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मुंबईच्या सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली असल्याची माहिती पाटील यांनी दिली. महाराष्ट्र सर्टसाठी विशेष इमारत उभारण्यात येणार आहे. सध्या ४७ सायबर लॅब सुरू करण्यात आल्या असून ४५ सायबर पोलीस स्टेशन्स कार्यान्वित झाले असल्याचे ते म्हणाले.
 
सायबर सुरक्षेसाठी विशेष प्रशिक्षण
सायबर सुरक्षेसाठी १३३ लोकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. याद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविण्याऱ्या घटनांचे विश्लेषण करण्यात येणार आहे. न्यायाधिशांसाठी असलेल्या प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर सायबर सुरक्षेसाठी प्रशिक्षण यंत्रणा राबविण्यात येणार असल्याचे रणजित पाटील यांनी स्पष्ट केले. सायबर गुन्ह्यांबाबत दोषसिद्धतेचा दर वाढावा यासाठी वकिलांनाही प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, सायबर सुरक्षेचे गांभीर्य आणि महत्त्व लक्षात घेता यासंदर्भात एक तासाची चर्चा घेण्यात यावी, असे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले.
 
@@AUTHORINFO_V1@@