कोकणच्या स्वतंत्र विद्यापीठाबाबत सकारात्मक विचार करू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2018
Total Views |

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे आश्वासन

 

 
मुंबई : शैक्षणिक दृष्टीने कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता असल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात असून त्यानंतर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
विधानपरिषदेचे सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ हवे, याबाबत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेदरम्यान उत्तर देताना ते बोलत होते. दरम्यान, कोकणातील विद्यार्थ्यांना विविध कामासाठी मुंबई येथील विद्यापीठात यावे लागू नये यासाठी विविध प्रशासकीय प्रक्रिया ऑनलाईन केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच सर्वत्र मुंबई विद्यापीठाला एक अनन्यसाधारण स्थान आहे. याचा विचार करता कोकणातील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठापासून वेगळे होणे कितपत योग्य आहे याचादेखील विचार होणे गरजेचे असल्याचे तावडे म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता सर्व संबंधित लोकप्रतिनीधींची लवकरच बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
@@AUTHORINFO_V1@@