अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात आता फाशीची शिक्षा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
हरियाणा विधानसभेत विधेयक पारित 
 
हरियाणा : हरियाणा विधानसभेने आज एक महत्त्वपूर्ण विधेयक पारित केले आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात आता फाशीची शिक्षा अथवा १४ वर्षांचा कारावास भोगावा लागू शकतो या संबंधीचे विधेयक आज हरियाणा विधानसभेत पारित करण्यात आले आहे. असे विधेयक पारित करणारे हरियाणा हे तिसरे राज्य आहे.
 
 
या ‘दंडविधी संशोधन विधेयक २०१८’ नुसार अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यास आरोपी व्यक्तीला कडक शिक्षा किंवा १४ वर्षांचा कारावास अथवा फाशीची शिक्षा दिली जाईल असे या विधेयकात म्हटले गेले आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यास आता वरील तीन शिक्षांपैकी एक शिक्षा आरोपीला होईलच असे यात म्हटले गेले आहे.
 
 
याआधी मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांनी या संबंधीचे विधेयक पारित केले होते. या विधेयकामध्ये १२ वर्षाखालील मुलीवर बलात्कार केल्यास आता सक्तीने फाशीची शिक्षा दिली जाईल असे नमूद करण्यात आले आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@