चंद्रपूर जिल्ह्यातील पशुधन विकासासाठी जेएनपीटीकडून सीएसआर निधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
मुंबई : १३ चंद्रपूर जिल्ह्यातील पशुधन विकासासाठी जेएनपीटीकडून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जे. के. ट्रस्ट यांना दीड कोटी रुपयांच्या निधीचा धनादेश देण्यात आला. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या सीएसआर निधीतुन ही रक्कम देण्यात आली आहे.
 
 
जे. के. ट्रस्टच्या वतीने चंद्रपूर येथे १५ एकात्मिक पशुधन विकास केंद्र सुरु करण्यात येणार आहेत ही केंद्रे मूल, पोंभुरणा आणि बल्लारपूर तालुक्यात स्थापन करण्यात येतील. या केंद्रात काम करण्यासाठी स्थानिक स्तरावरून १ गोपाळ नियुक्त केला जाईल तसेच त्यांना ३ महिन्याचे प्रशिक्षण दिले जाईल. अशाप्रकारे १५ केंद्रांसाठी १५ सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल.
 
 
या १५ तालुक्यांतर्गत अंदाजे ८० गावातील शेतकऱ्यांना लाभ मिळेल. या केंद्रात नियुक्त केलेले गोपाळ या ८० गावात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन पशुधन विकास विषयक सेवा पुरवतील. यामध्ये स्थानिक प्रजातीच्या पशुधनामध्ये सुधारणा करून दूध उत्पादन वाढविले जाईल. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढन्यास तसेच बालकांमधील कुपोषण कमी होण्यास मदत होईल.
 
 
हा प्रकल्प ३ वर्षांचा राहणार असून सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पशुधन विकासासाठी जेएनपीटीने दीड कोटी रुपयांचा निधी सामाजिक दायित्व निधीतुन उपलब्ध करून दिल्याबद्दल नीरज बन्सल यांचे आभार मानले तर हा प्रकल्प राबविणाऱ्या जे. के. ट्रस्टला उत्तम काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
@@AUTHORINFO_V1@@