एअर इंडियाचे ट्विटर अकाऊंट हॅक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2018
Total Views |

त्वरीत सुरक्षा योजना केल्यामुळे अकाऊंट पूर्ववत


 

मुंबई :
एअर इंडिया कंपनीचे ट्विटर अकाऊंट आज पहाटे हॅक करण्यात आले होते. मात्र ही माहिती मिळताच त्वरीत सुरक्षा योजना केल्यामुळे आता अकाऊंट पूर्ववत करण्यात आल्याची माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी आज सकाळी दिली आहे.
 
 
आज पहाटे कंपनीचे ट्विटर अकाऊंट हॅक करून त्यावर तुर्की भाषेतील काही पोस्ट टाकण्यात आल्या होत्या. यातील एका पोस्टमध्ये 'शेवटच्या क्षणी एक महत्वाची सूचना करत आहे, आमची सगळी विमान उ्ड्डाणे आम्ही रद्द करत असून यापुढील सर्व उड्डाणे तुर्कीश विमान कंपनीतून होतील, असे हॅकरने म्हटले होते. परंतु थोड्याच वेळात एअर इंडियाला या विषयी माहिती मिळाल्यानंतर तातडीने यावर उपाययोजना करत, यासर्व पोस्ट अकाऊंटवरून काढून टाकण्यात आल्या.
 
यानंतर एअर इंडियाने याविषयी माहिती देत कंपनीचे अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले. कंपनीने या घटनेनंतर एक ट्विट केले व सांगितले कि, 'या घटनेनंतर याबाबत उपाययोजना केल्या गेल्या आहेत. त्यामुळे या हँडलवर आता अकाऊंटला कसल्याही प्रकारचा धोका नसून हे अकाऊंट आता पूर्ववत सुरु करण्यात आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@