शिवनेरी, शिवशाहीच्या प्रवाशांसाठी आता वातानुकुलित प्रतिक्षालये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
मुंबई : शिवनेरी, शिवशाही बसेसच्या प्रवाशांकरीता बसण्यासाठी वातानुकूलित प्रतिक्षालये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांचे नुतनीकरण करुन त्यामध्ये अमुलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
 
 
मराठवाड्यातील राज्यपरिवहन महामंडळाच्या बसस्थानकांच्या दुरावस्थेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेदरम्यान रावते बोलत होते. एसटी स्थानकांच्या नुतनीकरणाच्या कामांतर्गत सर्व स्थानके आधुनिक करण्यात येणार असून सर्व नुतनीकरण महामंडळामार्फत करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तसेच बस स्थानकाबरोबरच आजुबाजूच्या परीसराचाही विकास करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी स्थानकावर सी.सी.टी.व्ही. यंत्रणा बसविण्यात येणार असून यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. दरम्यान, सदर काम दोन टप्प्यात करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
 
 
विमानतळाच्या धर्तीवर बस स्थानके
 
काही बस स्थानके विमानतळाच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे. तसेच विमानतळाच्या धर्तीवर वाहनतळ तयार करण्यात येणार आहे. यासाठी नकाशेही तयार करण्यात आल्याचे रावते म्हणाले. तसेच सैन्य दलातील सेवानिवृत्तांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात येणार असून एसटी स्थानकातील शौचालय सुयोग्य पद्धतीने उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
@@AUTHORINFO_V1@@