जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील बडगाम भागात पोलीस आणि सेनेच्या संयुक्त अभियानात आज पोलिसांना आणि सेनेला मोठे यश हाती लागले आहे. या अभियानात पोलीस आणि सेनेच्या जवानांनी मिळून तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. या तिन्ही दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्र साठ्यासोबत अटक करण्यात आली आहे.
 
 
स्फोटक पदार्थ, गोळ्या, बंदूक आणि अनेक शस्त्र साठ्यासोबत या तिन्ही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय लष्कराकडून सुरु करण्यात आलेल्या दहशतवादी विरोधी मोहिमेमध्ये लष्कराला काही दिवसांपूर्वी तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले होते.
 
 
काश्मीरमधील अनंतनाग येथे पहाटे झालेल्या चकमकीत तब्बल तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय लष्कराला यश आले होते तसेच या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@