अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची गच्छंती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |

'सीआयए'चे प्रमुख नवे मंत्री

'सीआयए'च्या प्रमुख पदावर प्रथमच एका महिलेची निवड




वॉशिंग्टन :
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय आणि गुप्तचर संस्था सीआयए या दोन्ही विभागांच्या महत्त्वाच्या पदांवर काल दोन महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीआयएचे सध्याचे प्रमुख माईक पॉम्पियो यांची अमेरिकेचे नवे परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे, तसेच माईक पॉम्पियो यांच्यानंतर सीआयएचे प्रमुख म्हणून जिना हॅस्पेल या महिलेची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या इतिहासात हॅस्पेल या सीआयएच्या पहिल्या महिला प्रमुख ठरल्या आहेत. ट्रम्प यांनी ही घोषणा ट्वीटरच्या माध्यमातून केल्यामुळेही सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.
 
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी काल रात्री या नव्या नियुक्त्यांविषयी घोषणा केली आहे. आपल्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही माहिती देताना, त्यांनी अमेरिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या नियुक्त्या करता असल्याचे म्हटले आहे. सीआयएचे सध्या प्रमुख माईक पॉम्पियो हे अमेरिकेचे नवे परराष्ट्र मंत्री असणार असून माईक यांची जागा यापुढे हॅस्पेल या सांभाळतील, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच हॅस्पेल या अमेरिकेच्या पहिल्या महिला आहेत, ज्यांची या पदासाठी नियुक्ती करण्यात आली असून हे दोघे जण आपले काम अत्यंत उत्तमपणे करतील, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. याचबरोबर अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री रेक्स टिलर्सन यांच्या आजपर्यंतच्या कार्याबद्दल ट्रम्प यांनी त्यांचे देखील आभार मानले आहेत.


 
दरम्यान टिलर्सन यांच्या जागी अचानक नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती केल्यामुळे जागतिक राजकारणात सध्या अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. टिलर्सन यांना मुद्दाम या पदावरून हटवण्यात आले असून यामागे काही राजकारण असल्याचे बोलले जात आहे. तसेच ट्रम्प आणि टिलर्सन यांच्यात काही वैचारिक मतभेद असल्यामुळे त्यांना या पदावरून हटवण्यात आले असल्याचा तर्क देखील काही अभ्यासकांकडून मांडला जात आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@