रामनाथ कोविंद यांचा पहिला मादागास्कर दौरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज मादागास्कर देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत. मादागास्कर देशाच्या दौऱ्यावर जाणारे ते पहिले भारतीय राष्ट्रपती ठरले आहे. मादागास्करची राजधानी अंटानानारिवो येथे नुकतेच रामनाथ कोविंद यांचे आगमन झाले आहे. याआधी ते मॉरीशस देशाच्या दौऱ्यावर होते.
 
 
 
मादागास्करचे पंतप्रधान ओलिवियर सोलनन्द्रसान यांनी रामनाथ कोविंद यांचे विमानतळावर स्वागत केले. आज रामनाथ कोविंद तेथील महत्वाच्या नेत्यांशी भेट घेणार असून त्यांच्यासोबत काही महत्वाच्या चर्चा करणार आहेत. या देशाचा दौरा करणारे रामनाथ कोविंद हे भारताचे पहिले राष्ट्रपती असल्याने यापुढे मादागास्कर या देशाशी आपले संबंध चांगले होईल असे म्हणण्यास हरकत ठरणार नाही. 
 
@@AUTHORINFO_V1@@