ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी भरघोस निधी उपलब्ध– आ. उन्मेशदादा पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |
 
 

ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी भरघोस निधी उपलब्ध– आ. उन्मेशदादा पाटील

 चाळीसगाव -
तालुक्यातील प्रत्येक गाव हे मुख्य रस्ता व शहराला जोडले जावे यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या रस्ते विकास निधीतून यावर्षी कोट्यावधींची कामे तालुक्यात प्रस्तावित असून अनेक वर्षानंतर ग्रामीण मार्ग, जिल्हा मार्गांची दर्जोन्नती करण्यात आली आहे. त्यामुळे येणारे वर्ष खऱ्या अर्थाने रस्ते विकासाचे वर्ष असेल यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला असल्याचे प्रतिपादन आमदार उन्मेशदादा पाटील यांनी मेहुणबारे, धामणगाव व दरेगाव येथील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी केले. यावेळी पंचायत समिती सभापती दिनेशभाऊ बोरसे, उपसभापती संजय तात्या पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष के बी साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मा आबा वाघ, जिल्हा परिषद सदस्या मोहिनी अनिल गायकवाड, पं.स.सदस्या रुपाली पियुष साळुंखे, भाजपा गटप्रमुख भैय्या दादा वाघ, यांच्यासह मेहुणबारे, धामणगाव व दरेगाव पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
 
 

मेहुणबारे येथे १४ व्या वित्त आयोग अंतर्गत अंगणवाड्या, रस्ते कॉक्रिटीकरण आदी विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले तर धामणगाव येथे १) रा.मा.२११ धामणगाव रस्ता डांबरीकरण (pmgsy) किंमत ३५.३६ लक्ष भूमिपूजन, २) गावअंतर्गत रस्ता कॉक्रेटीकरण (आमदार निधी) किंमत ५ लक्ष (भूमिपूजन) करण्यात आले.

 
 

दुर्गम भागाला नाशिक जिल्ह्याशी जोडणारा सेतू अखेर पूर्ण 

चाळीसगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या दरेगाव गावातून सेवानगर मार्गे पिलखोड (चाळीसगाव तालुका) व मालेगाव नाशिक जिल्ह्यात जाण्यासाठी अत्यंत सोयीचा हा रस्ता आहे. काही वर्षांपूर्वी अतिशय दयनीय अवस्था असणाऱ्या या रस्त्यांचे भाग्य बदलले असून आमदार उन्मेशदादा पाटील यांनी जन्मभूमीचे पांग फेडत या रस्त्याची दुरुस्ती मागील ३ वर्षात केली आहे. याच रस्त्यावर भालकोट मंदिराजवळ नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात हा मार्ग बंद पडत असे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाश्यांना नाईलाजाने १० किमी चा फेरा पार करावा लागत असे. आमदार उन्मेशदादा पाटील यांनी दरेगाव सेवानगर रस्त्यावरील भालगोट मंदिराजवळ पुलासाठी ७५.८२ लक्ष रुपये मंजूर करून मागील वर्षी त्याचे भूमिपूजन देखील केले होते. एकाच वर्षात सदर काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण देखील शेकडो यावेळी करण्यात आले.


 
@@AUTHORINFO_V1@@