बॉलीवूडला आणखी एक धक्का, एका 'रईस' अभिनेत्याचा प्रवास संपला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |

 
 
काही आठवड्यांपूर्वीच श्रीदेवीच्या अचानक जाण्याने बॉलीवूडबरोबच तिच्या तमाम चाहत्यांना धक्का बसला होता. या धक्क्यातून सर्वजण सावरताय तोवरच आज आणखी एक असाच धक्का एका घटनेमुळे बसला आहे. नरेंद्र झा खूप लोकप्रिय अभिनेता नसला तरी काही मोजक्या हिंदी चित्रपटातून त्याने आपली छाप रसिकांवर सोडली आहे. ज्यांनी शाहरुख खानचा 'रईस' बघितला असेल आणि त्यांना मुसा भाई आठवत असेल तर तो मुसा भाई याच नरेंद्र झाने साकारला होता. आज पहाटे नाणेगाव येथील नरेंद्रच्या फार्म हाउसवरच त्याची हृदयक्रिया बंद (cardiac arrest) पडल्याने त्याचे निधन झाले. नरेंद्र झा यांचे वय ५५ होते. या अभिनेत्याच्या लेखी खूप हिट चित्रपट नसले तरी जेवढ्या चित्रपटातून त्याने अभिनय केलाय त्यातून तो रसिकांसाठी नक्कीच 'श्रीमंत (रईस)' ठरला असणार.

नरेंद्र यांची प्रकृती अतिशय व्यवस्थित असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. एवढंच काय तर काल सकाळी त्यांनी फेसबुकवर वैतारना नदीच्या परिसरात 'रिव्हर वॉक' केल्याची पोस्ट आणि फोटो देखील प्रसिद्ध केला होता. ती पोस्ट बघितल्यावर असं कुणालाही वाटणार नाही की ही व्यक्ती उद्या आपल्यासोबत नसेल...
 
 
बिहार मधील मधुबनी या छोट्या गावातून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मुंबईला आले होते. टीव्ही मालिका व चित्रपटात छोटी-मोठी कामं करून संघर्ष करत करत हा कलाकार आज इथवर पोहचला होता. मंदिरा बेदी सोबत 'शांती' या मालिकेपासून नरेंद्रने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 'रईस'च्या अगोदर लक्षात रहावी असे त्याचे काम आपल्याला 'हैदर', 'काबील', 'मोहनजेदारो', 'घायल वन्स अगेन' या चित्रपटातून पाहायला मिळाले. आगामी काळात सलमान खानच्या 'रेस-३' व प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या 'साहो' या दोन बिग बजेट चित्रपटातून नरेंद्राचा बहारदार अभिनय बघण्याची संधी आपल्याला मिळाली असती. पण दुर्दैवाने आता तसं होणार नाही.
 
 
 
नरेंद्र झाच्या अचानक जाण्याने बॉलिवूडकर पुन्हा एकदा हादरले असून श्रीदेवी गेल्याच्या दिवसानंतर आज पुन्हा एकदा 'शॉकिंग' हा शब्द बऱ्याच सेलिब्रेटींच्या पोस्ट मध्ये दिसून येत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी तर या व्यवसायालाच खुन्याची उपमा दिली आहे. मेहता यांच्या बरोबरच अनेक सेलेब्रेटींनी झा यांना ट्विटरवरून आदरांजली अर्पण केली आहे.
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@