उप्र लोकसभा पोटनिवडणूक : अमित शाह घेणार पत्रकार परिषद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |




Live Update :   

थोड्याच वेळात भाजप अध्यक्ष अमित शाह घेणार पत्रकार परिषद 

उमेदवारांच्या आघाडीवर सपा-बसपाच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आनंद साजरा 

गोरखपूरमध्ये सपाचे प्रवीण कुमार ८९ हजार ९५० मतांसह आघाडीवर

फुलपूरमध्ये सपाचे नागेंद्र प्रताप सिंह पटेल ९९ हजार ५५७ मतांसह आघाडीवर


लखनऊ :
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर आणि फुलपूर येथील लोकसभेच्या दोन जागांसाठीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली असून या दोन्ही जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रतिष्ठेचे विषय बनलेल्या या निवडणुकीचा नेमका निकाल काय लागणार ? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
 
 
आज सकाळी या मतमोजणीला सुरुवात झाली असून सकाळपासून भाजप आणि सपा-बसपा आघाडी यांच्यामध्ये या दोन्ही ठिकाणी कलगीतुरा रंगला आहे. सकाळपासून दोन्ही पक्षांचे उमेदवार आलटूनपालटून एकमेकांवर आघाडी घेत असल्यामुळे यामध्ये कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. गोरखपूर येथे योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ असून याठिकाणाहून ते अनेक वेळा लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. त्यामुळे गोरखपूरची जागा ही योगी आदित्यनाथ यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.
 
 
तसेच फुलपूर हा केशवप्रसाद मौर्य यांचा मतदारसंघ राहिलेला आहे. त्यामुळे ही जागा देखील भाजपसाठी महत्त्वाची आहे. परंतु याठिकाणी देखील सपा-बसपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांवर असलेली सपा-बसपा युती ही भाजपासाठी डोकेदुखी ठरत आहे.
 
 
दरम्यान कॉंग्रेस पक्ष ही निवडणूक स्वतंत्रपणे लढत असल्यामुळे याचा मोठा फटका कॉंग्रेसला बसला आहे. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाललेल्या कॉंग्रेसला या पोटनिवडणुकांमध्ये देखील जनतेनी स्पष्टपणे नाकारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@