टी-२०: भारताला पहिला धक्का, शिखर धवन बाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
कोलंबो : भारत आणि बांग्लादेश यांच्यात आज टी-२० सामना प्रेमदासा मैदानावर सुरु झाला असून बांग्लादेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून प्रथम रोहित शर्मा आणि शिखर धवन हे प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरले आहेत. भारत सध्या ७० धावा एक बाद अशा स्थितीत खेळत आहे.
 
 
 
 
 
 
आजचा सामना भारताने जिंकला तर उद्या होणाऱ्या सामन्यात श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात जो संघ जिंकेल त्याच्यासोबत भारत अंतिम सामन्यात खेळेल. त्यामुळे आजचा सामना भारताला जिंकणे महत्वाचे ठरणार आहे. कालच्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ६ गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे श्रीलंकेसोबत झालेल्या दोन सामन्यात भारताने यश मिळविले आहे.
 
 
 
आता आजचा सामना कोणता संघ जिंकतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आजचा सामना भारताने जिंकला तर तो अंतिम सामन्यात खेळू शकेल. 
 
@@AUTHORINFO_V1@@