शेवटाचा प्रारंभ झाला आहे : ममता बॅनर्जी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |

 
 
पश्चिम बंगाल :  उत्तरप्रदेश येथील पोट निवडणुकींमध्ये बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या युतीने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना अभिनंदन देताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'शेवटाचा प्रारंभ झाला आहे." अशा भावना व्यक्त केल्या.
 
 
 
 
 
त्यांचा इशारा भारतीय जनतापक्षाकडे होता. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर आणि फुलपूर येथील लोकसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाने बाजी मारली. त्यापार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी मायावती आणि अखिलेश यादव यांचे अभिनंदन करत समाज माध्यमांवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
या दोन्ही जागांवर भारतीय जनता पक्षाला बसलेल्या फटक्यामुळे विरोधकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच या विषयी भारतीय जनता पक्षातर्फे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेवून पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@