एमपीएससीतून मोठी पदभरती करणार : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
मुंबई : राज्यातील तरूणांना एमपीएससी अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले.
 
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने बेरोजगारीचे सर्व्हेक्षण दर तीन महिन्यानी करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत वार्षिक सर्वेक्षण करण्यात येत होते. मात्र, यापुढे त्रैमासिक अहवालाद्वारे आकडेवारी प्राप्त होणार आहे. नवीन वेतन आयोगानुसार भरती करण्यात येणा-या पदांचा आढावा घेण्यात येणार असून, यानंतर भरती करण्यात येणार आहे.
 
गृह, कृषी, आरोग्य, पाणीपुरवठा व जलसंपदा या विभागांना पूर्ण भरतीचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे एमपीएससीच्या माध्यमातून जास्तीत जास्त नोकरीच्या संधी देण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@