कोरोगाव - भीमा हिंसाचार प्रकरणात मिलिंद एकबोटे यांना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |

 
पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी आरोप असलेले मिलिंद एकबोटे यांना अखेर आज पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एकबोटे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
 
उच्च न्यायालयाने एकबोटे यांना जामीन अर्ज फेटळून लावल्यानंतर एकबोटेंच्या अटकेविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात येत होती. एकबोटे तपासात सहकार्य करत नाही, असा अहवाल राज्य सरकारतर्फे न्यायालयात सादर करण्यात आला होता.
 
हा अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने एकबोटे यांचा जामीन अर्ज फेटाळला. कोरेगाव - भीमा प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, तसेच हा हिंसाचार घडला त्यादिवशी आपण त्या परिसरात नव्हतो, अशी भूमिका एकबोटे यांनी स्पष्ट केली होती. मात्र जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अखेर त्यांना आज अटक करण्यात आली.
@@AUTHORINFO_V1@@