आयएसएसएफ स्पर्धेत भारताचे स्थान अव्वल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
हंगरी : आंतरराष्ट्रीय नेमबाज स्पोर्ट फेडरेशन अर्थांत आयएसएसएफ स्पर्धेत भारताच्या नेमबाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील पदतालिकेत भारत अव्वल क्रमांकावर आहे. आज सकाळी भारतात या नेमबाजांचे आगमन झाले यावेळी भारतीयांनी त्यांचे जल्लोषात विमानतळावर स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
 
 
 
 
 
 
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने देखील ट्वीटरच्या माध्यमातून या सगळ्या नेमबाजांना शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेत भारताला चार सुवर्ण पदक मिळाले असून एक रौप्य आणि चार कांस्य पदक मिळाले आहे. या स्पर्धेत भारताला एकूण नऊ पदक मिळाले आहेत. त्यामुळे भारत नऊ पदकांसोबत या स्पर्धेत अव्वल स्थानी उभा राहिला आहे.
 
 

 
 
 
या पदतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका असून अमेरिकेला तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदक मिळाले आहे. अमेरिकेला एकूण सहा पदक मिळाले आहे. त्यामागे चीन असून चीनला दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक मिळाले आहे. चीन एकूण पाच पदक मिळाले आहे. त्यामुळे या पदतालिकेत भारत अव्वल असून भारतीय नेमबाजांनी चांगली कामगिरी केली आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@