गुजरात विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांची मुजोरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |

 
 
गांधीनगर : गुजरात येथे विधानसभेत कामकाज सुरु असताना काँग्रेसच्या आमदारांच्या मुजोरपणाचे एक भीषण दृष्य आज बघायला मिळाले. कामकाज सुरू असताना काँग्रेसचे आमदार प्रताप तुधात यांनी भाजपचे आमदार जगदीश पांचाळ यांना माईक उचलून मारहाण केल्याची घटना आज घडली आहे.
सत्ताधारी विरोधकांना बोलू देत नसल्याच्या कारणावरून आज गुजरात विधानसभेत मोठा गदारोळ झाला. त्या यादरम्यान ही घटना घडली. यामध्ये माईक उचलून फेकल्याने वातावरण तापले आणि सभापतींनी विधानसभेचे कामकाज तहकूब करण्याचे आदेश दिले.
 
सत्ताधारी पक्षाचे आमदार विरोधकांनी बोलू देत नाहीत, असा आरोप करत काँग्रेस आमदारांनी गदारोळ केला. यादरम्यान पांचाळ यांनी माईक उचलून तुधात यांना मारहाण केली. गुजरात विधानसभेत भाजपचे ९९ तर काँग्रेसचे ७७ आमदार आहेत. आजच्या या घटनेमुळे गुजरात येथील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@