विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी मिळणार शून्य रकमेचे खाते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |

सामाजिक न्याय व अल्पसंख्यांक राज्यमंत्र्यांची माहिती

 

 
 
 
मुंबई : विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यासाठी आता त्यांचे शून्य रकमेचे खाते उघडण्यात येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्याना अशी खाती उघडून देण्यासाठी सर्व बँकांना निर्देश देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व अल्पसंख्यांक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली.
 
केंद्र शासनामार्फत अल्पसंख्यांक समाजाला देण्यात येणा-या शिष्यवृत्तीच्या रकमेत आणि शिष्यवृत्तीसाठी राज्य शासनाच्या कोट्यामध्ये वाढ करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे कांबळे म्हणाले. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळण्यास अडचण येत असल्यावर लक्षवेधी मांडण्यात आली होती. त्याला उत्तर देताना कांबळे बोलत होते. शिष्यवृत्तीची कार्यपद्धती सुलभ असून यात सदस्यांच्या सूचना आल्यास आवश्यक ते बदल करण्यात येतील. तसेच जिल्हास्तरावर बँकेची बैठक घेतली जाईल आणि संबंधितांना पालकमंत्र्यांद्वारे सूचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जेवढे अर्ज येतील तेवढ्या शिष्यवृत्ती देण्याबाबत तसेच राज्य शासनाचा अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठीचा कोटा २ लाख ७३ हजार असून तो अधिक मिळवून देण्याबाबत केंद्र शासनामार्फत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कांबळे म्हणाले.
 
@@AUTHORINFO_V1@@