पनवेल येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |
 
 
 
मुंबई : पनवेल (जि. रायगड) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायालये स्थापन समितीने मान्यता दिली असून त्यानुसार न्यायालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. मात्र, पदांची निर्मिती, आवश्यक खर्चास मान्यता आदी माहिती रायगड जिल्हा न्यायालयाकडून मागवण्यात आली असून ही माहिती प्राप्त झाल्यानंतर न्यायालय स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
 
पनवेलचे आमदार व रायगड भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पनवेल येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यासाठी पदांची निर्मिती व त्यासाठी आवश्यक खर्चास वित्त विभाग, उच्चस्तरीय सचिव समिती व मंत्रीमंडळाची मान्यता मिळणे आवश्यक असल्यामुळे प्रस्तावाची परिपूर्ण माहिती रायगड जिल्हा न्यायालयाकडून मागविण्यात आली आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर न्यायालय स्थापन करण्यास मान्यता देण्याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
@@AUTHORINFO_V1@@