रायगड किल्ल्याचा सर्वांगिण विकासासाठी ६०६ कोटींचा विकास आराखडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

 
 
 
 
 
मुंबई : रायगड किल्ल्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाने ६०६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. यापैकी ६० कोटींचा निधी जिल्हाधिकारी स्तरावर वर्ग करण्यात आल्याचे सदस्य जयंत पाटील यांनी यासंदर्भात विचारलेल्या तारांकीत प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले.
 
भारतीय पुरातत्व खात्यामार्फत आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवून रायगड किल्ल्याचा सर्वांगिण विकास करणार असल्याची माहिती पर्यटनमंत्र्यांनी यावेळी दिली. देश–परदेशातील पर्यटकांना रायगडावर आकर्षित करून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने ३१ मार्च २०१७ रोजी या किल्ल्याच्या विकासासाठी ६०६ कोटी रुपयांच्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्याचे ते म्हणाले.
 
निधीतून अनेक विकासकामे होणार
या निधीतून किल्ला आणि परिसरात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पाथ – वे, लाईट आणि साऊंड शो यांसारखी अनेक विकासकामे करण्यात येणार असल्याचे रावल म्हणाले. वर्षभरातील कालावधीत केंद्रीय पुरातत्व खात्यानेही विविध परवानग्या दिल्या असून विकासकामांचा ६० कोटी रुपयांचा पहिला हप्ता जिल्हाधिकाऱ्यांना वर्गही करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
छत्रपती संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरण
रायगडच्या विकासासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली एक प्राधिकरणही स्थापन करण्यात आल्याचे रावल म्हणाले. तसेच या कामांसाठी अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यांच्यामार्फत रायगड किल्ल्याच्या विविध विकास कामांना गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
@@AUTHORINFO_V1@@