उत्तर आणि दक्षिण दिल्लीला जोडणाऱ्या मेट्रो पिंकलाइनला आज पासून सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |

 
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली हे शहर खूप मोठे आहे. त्यामुळे एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी येण्याजाण्यातच सगळा वेळ जातो. मात्र दिल्लीतील मेट्रो सेवेमुळे या समस्येवर मोठ्या प्रमाणात तोडगा निघाला आहे. दिल्ली येथे उत्तर आणि दक्षिण दिल्लीला जोडणारी मेट्रोची 'पिंक लाइन' आज पासून सुरु झाली आहे.
 
 
 
 
 
या आधी 'येलो आणि ब्लू' अशा दोन लाइन सुरु होत्या. मात्र आता 'पिंक लाइन' सुरु झाल्याने दिल्लीकरांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये १२ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.
 
आज या मेट्रो लाइनचे उद्घाटन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राज्यमंत्री हरदीप पूरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. उत्तर आणि दक्षिण दिल्लीला जोडणाऱ्या या पिंक लाइनमुळे आता दिल्ली करांचा प्रवास आणि रोजचे आयुष्य सुखकर होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@