बाबरी मशिद प्रकरणी केवळ मुख्य पक्षकारांच्या याचिका ग्राह्य : सर्वोच्च न्यायालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली : अयोध्येतील बाबरी मशिद प्रकरणात सुरु असलेल्या सुनावणीत आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या संबंधी तीन मुख्य पक्षांशिवाय अन्य कुणीही दाखल केलेली याचिका ग्राह्य धरली जाणार नाही असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने इतर सर्व याचिका फेटाळल्या आहेत.
 
 
 
या याचिकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेचा देखील समावेश आहे. आता केवळ सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही अखाडा आणि राम लला विराजमान या तीन पक्षकारांच्याच याचिकेची दखल घेतली जाणार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
 
 
 
गेल्या सुनावणी दरम्यान वक्फ बोर्डातर्फे नेमण्यात आलेले वकील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी या सुनावणीला पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत थांबविण्याची विनंती केली होती. "या विषयातील निर्णयाचे पडसाद बघता ही सुनावणी २०१९ पर्यंत थांबवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने या मागणीचे काहीच ठोस कारण दिसत नसल्याने ही मागणी फेटाळली.
 
 
 
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने आणि समाजातील दोन महत्वाच्या घटकांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय असल्याने या सुनावणी विषयी जनतेला उत्सुकता आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@