ॲण्टी नार्कोटिक्स सेल चे बहुतांश छापे यशस्वी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |

अंमली पदार्थविरोधात कारवाईचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

 
 
 
 
मुंबई : पोलीस दलातील अंमली पदार्थ विरोधी कक्ष (ॲण्टी नार्कोटिक्स सेल) ने अंमली पदार्थाच्या साठवणूक तसेच वितरणाबाबत कारवाईसाठी माहिती मिळावी यासाठी सक्षम गुप्तवार्ता जाळे (इन्टेलिजन्स नेटवर्क) कार्यान्वित केले असून खासगी खबऱ्यांच्या माध्यमातून या विभागाला बऱ्याच अंशी अचूक माहिती मिळते. त्यामुळे मिळालेल्या माहितीच्या आधारे विभागाने केलेले बहुतांश छापे यशस्वी झाले असे सांगत या सेलचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.
 
मुंबईतील जोगेश्वरी येथे आंबोली पोलिसांनी मेफेड्रेन (एमडी) ड्रग्जचा साठा जप्त केल्याच्या घटनेबाबत आमदार शशिकांत शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
 
या प्रकरणात केलेल्या तपासानुसार अंमली पदार्थांचा पुरवठा करणारा मुख्य सूत्रधार डोंगरी (मुंबई) येथे राहणारा राजीक युसूफ मर्चंट उर्फ राजीक चिकना असल्याचे आढळून आले आहे. त्याने या कामासाठी मोहम्मद ओवेस फारुख अहमद शेख उर्फ कलंदर याला नेमले होते. अटक करण्यात आलेल्या कलंदर आणि अन्य आरोपीचे सर्व मोबाईल डिटेल्स काढले असता त्यांच्यातील संपर्काची माहिती मिळालेली आहे. त्यानुसार योग्य पद्धतीने तपास करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
@@AUTHORINFO_V1@@