विज वितरण कंपनीचे कर्मचारी निदर्शने करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018
Total Views |
 
विज वितरण कंपनीचे कर्मचारी निदर्शने करणार
जळगाव, 13 मार्च
महाराष्ट्र राज्य विज मंडळाच्या महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीन्ही कंपन्यांमधील 87 हजार कर्मचा­यांचे प्रश्न शासनाने सोडविले नसल्याने 14 रोजी प्रकाशगड मुंबई येथे हजारो पदाधिकारी निदर्शने करणार आहे.
 
 
कामगारांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलने, निदर्शने, धरणे आंदोलन व सभा अशा विविध मार्गाने आंदोलन करण्यात आले . परंतु शासनाने कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.म्हणून बुधवार 14 रोजी मुंबई येथे प्रकाशगड येथे सकाळी 11 ते 5 या वेळेत हजारो पदाधिकारी धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधणार आहे.विनाअट पेंशन योजना लागु करा, महावितरण मधील फ्रैन्चाइझी रद्द करवी, खाजगी भांडवलदारांकडून वीज खरेदी बंद करा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनानंतरही प्रशासनाने ताठर भुमिका कायम ठेवल्यास कृती समितीच्यावतीने 26 मार्चच्या मध्यरात्री पासून 28 मार्चच्या मध्यरात्री पर्यंत राज्यभरातील सर्व वीज कर्मचारी , अधिकारी अभियंते 48 तासांच्या संपावर जाण्याचा निर्णय कृती समितीच्यावतीने सहभागी 7 संघटना जाहिर करतील.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@