श्रीलंकेला लोळवून भारताचा सलग दुसरा विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018
Total Views |

श्रीलंकेवर सहा गडी राखून मात

 

 
कोलंबो : भारत, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या तिरंगी सामन्यांच्या मालिकेमध्ये काल झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ६ गडी राखून विजय मिळवला आहे. श्रीलंका संघाने दिलेले दिलेले ९ बाद १५२ धावांचे आव्हान भारताने ६ गडी राखून अगदी लीलया पार केले. तसेच मालिकेतील दुसरा सामना आपल्या खिशात घातला आहे. या विजयासह सध्या स्पर्धेमध्ये भारतीय संघ अव्वलस्थानी पोहोचला आहे.
कोलंबोमधील प्रेमादास मैदानावर हा सामना घेण्यात आला होता. यामध्ये भारतीय संघाने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आलेल्या श्रीलंकेच्या संघाकडून कुशल मेंडीस याने ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर त्यापाठोपाठ उपुल थरंगा (२२), डी. शंका (१९), धनुष्का गुणतिलका (१७) तर थिसरा पेरेरा यांनी १५ धावांची खेळी करत, श्रीलंकेला ९ बाद १५२ धावांची मजल मारून दिली. याबदल्यात भारतीय संघांकडून शार्दुल ठाकूर याने एकट्याने श्रीलंकेचे ४ बळी घेतले. तसेच वॉशिंग्टन सुंदर याने २ तर उनाडकट, चहल आणि विजय शंकर या तिघांनी प्रत्येक एक-एक बळी घेतला.



यानंतर आलेल्या भारतीय संघाने मात्र श्रीलंकेने दिलेले हे आव्हान लीलया पार केले. भारताकडून मनीष पांड्ये याने सर्वाधिक ४४ धावांची (नाबाद) खेळी केली. त्यापाठोपाठ दिनेश कार्तिक (नाबाद ३९) सुरेश रैना (२७), लोकेश राहुल (१८), रोहित शर्मा (११) तर शिखर धवन याने ८ धावा केल्या. या बदल्यात श्रीलंकेकडून अखिला धनंजया याने भारताचे दोन बळी घेतले तर नुवान प्रदीप आणि पेरेरा यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतले.

श्रीलंकेचा डाव : 





भारताचा डाव : 



@@AUTHORINFO_V1@@