विजयराव पुराणिकच भाजपचे नवे प्रदेश संघटनमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018
Total Views |

केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती

 
 
 
 
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताचे माजी प्रचारक व नुकतेच संघाने नव्या रचनेत राजकीय क्षेत्रात रवानगी केलेले विजयराव पुराणिक यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या रिक्त असलेल्या संघटनमंत्रीपदी होणार असून, या नियुक्तीची आता केवळ औपचारिक घोषणा होणे शिल्लक आहे.
 
 
महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महा एमटीबीसोबत बोलताना याबाबत माहिती दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांत (गुजरात, महाराष्ट्र, गोवा) प्रचारकपदाची जबाबदारी सांभाळणारे विजय पुराणिक यांची संघाने नुकतीच राजकीय क्षेत्रात रवानगी केली. भाजपमध्ये सध्या रिक्त असलेल्या व संघटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'संघटनमंत्री' पदावर त्यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा होत होती. या चर्चेला दुजोरा देत पुराणिकच नवे प्रदेश संघटनमंत्री असतील असे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले.
 
 
येत्या काही दिवसांतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह किंवा केंद्रीय संघटनमंत्री रामलाल हे या विजयराव पुराणिक नियुक्तीबाबत अधिकृतरित्या घोषणा करतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. महाराष्ट्र प्रदेश भाजपचे माजी संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांच्या राजीनामा व राजकीय क्षेत्रातील निवृत्तीनंतर गेले काही महिने हे पद रिक्त होते.
 
@@AUTHORINFO_V1@@