शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीसाठी पोलीस वसाहतीमध्ये मिळणार जागा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018
Total Views |

दत्तात्रय कराळे यांचे आश्‍वासन; कृषी महोत्सवाचा समारोप


जळगाव :
शेतकर्‍याने पिकविलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा तसेच ग्राहकांनाही दर्जेदार उत्पादने विकत मिळावीत या हेतूने शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस वसाहत येथे जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले.
 
 
शासनाचा कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा (आत्मा) जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खान्देशातील सर्वात मोठ्या जळगाव जिल्हा कृषी महोत्सवाचा समारोप सोमवारी सागर पार्क मैदानावर झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कराळे बोलत होते. शेतकर्‍यांनी वेगवेगळया तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतमालाची उत्पादकता वाढवावी. त्याचबरोबर शेतमाल विक्रीचे तंत्रही अवगत करावे, असे आवाहन त्यांनी केले.
 
 
व्यासपीठावर कृषी महोत्सव संयोजन समितीचे सदस्य तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी मधुकर चौधरी, पाल येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम अधीक्षक डॉ. एस. पी. सिंह, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे, उपविभागीय कृषी अधिकारी गोरख लोखंडे, जिल्हा बीज गुणक अधिकारी सोनवणे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक के. डी. महाजन उपस्थित होते. महोत्सवात शेती क्षेत्राशी निगडीत दोनशेहून अधिक कंपन्याचे २४८ स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलधारकांमधील उत्कृष्ट स्टॉलधारक म्हणून ड्रोनद्वारे पिकांवर फवारणीचे प्रात्याक्षिक दाखविणार्‍या सिमट्रॉनिक्स ऑटोमेशन प्रा. लि. यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. शेती यंत्रणा ग्रो मशिनरी या स्टॉलला द्वितीय क्रमांकाचे, सहृयाद्री फामर्स प्रा. लि. कंपनी या स्टॉलला तृतीय, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीच्या स्टॉलला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचलन कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी केले. आभार आत्माचे प्रकल्प उपसंचालक के. डी. महाजन यांनी मानले.
 
 
प्रदर्शनात १ कोटी रुपयांची उलाढाल
ग्राहकांनी सेंद्रीय शेतमाल तसेच इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. या प्रदर्शनात गेल्या पाच दिवसात अंदाजे एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाल्याची माहिती आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले यांनी दिली.
 
@@AUTHORINFO_V1@@