जळगावमध्ये तीन दिवसांत पावसाचा अंदाज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
जळगाव :
दक्षिण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, गार वारे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राकडे वेगाने वाहत आहेत. यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत जळगावला वादळी वार्‍यांसह जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज वेधशाळेचा आहे, अशी माहिती भारतीय वेधशाळेचे शास्त्रज्ज्ञ एस. जी. कांबळे यांनी ‘तरूण भारत’ला दिली.
 
 
दक्षिण किनारपट्टीवर कमी दाबाचा तीव्र पट्टा निर्माण झाला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राकडे हे वारे वेगाने वाहत आहे. यामुळे येत्या दोन दिवसात जळगावला वादळी वार्‍यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. खान्देशातील शेतकर्‍यांनी जागरूक रहावे असा इशाराही वेधशाळेने दिला आहे.
 

येत्या आठवड्यातील कमाल - १३ मार्चः ३७.० १४ मार्चः ३६.० १५ मार्चः ३५.० १६ मार्चः ३४.० (वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता) १७ मार्चः ३४.० (वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता) १८ मार्चः ३४.० (वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता).

 
@@AUTHORINFO_V1@@