कचरा समस्येचे निर्मूलन गरजेचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018
Total Views |

आ.संजय सावकारे यांनी व्यक्त केले मत


 
 
भुसावळ :
राज्य शासन आता यापुढे कोणत्याही नगरपालिका क्षेत्रासाठी डंपिंग ग्राऊंड देणार नाही. त्यामुळे कचरा समस्येचे निर्मुलन करणे काळाची गरज आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य आहे. प्रत्येकाने ओला व सुका कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावली पाहिजे, असे मत आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केले.
 
 
महिला दिनानिमित्त येथील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे ‘किचन वेस्ट मॅनेजमेंट’ विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे किचन वेस्ट मॅनेजमेंट तज्ज्ञ कौस्तुभ यद्रे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रा. राजेंद्र शिंदे, आरोग्य सभापती मेघा वाणी, पं.स. उपसभापती मनिषा पाटील, सदस्या वंदना उन्हाळे, भारती भोळे, लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे, शैलजा नारखेडे, संगीता बियाणी, प्राचार्या नीता कटलर, डॉ. मनिषा दावलभक्त आदींची उपस्थिती होती.
 
 
कचर्‍याची निर्मिती आपणच करतो. त्यामुळे त्याची विल्हेवाटदेखील आपणच लावली पाहिजे. घरच्या घरी कंपोस्ट खतनिर्मिती करता येणे शक्य आहे, असे मत कौस्तुभ यद्रे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. राजेंद्र शिंदे, रमण भोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. किचन वेस्ट मॅनेजमेंट क्षेत्रात कार्य करणार्‍यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यात आयएमएच्या महिला विभागाच्या अध्यक्षा डॉ.नीलिमा नेहते, ग्रीन अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. वसंत खरे, आरती चौधरी, धनश्री जोशी, रणजित राजपुत यांचा समावेश होता. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी प्रास्ताविक केले. अलका भटकर, सुनंदा भारुळे, सरला सावकारे यांनी सूत्रसंचालन केले. अनिता आंबेकर यांनी आभार मानले.
 
@@AUTHORINFO_V1@@