आयटीच्या दोन लाख नोकर्‍यांसाठी जपानचे दरवाजे खुले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018
Total Views |

२०३० पर्यंत आठ लाख भारतीयांना नोकर्‍या देण्याची जपानची तयारी
जपानमुळे भारतीय आयटी तज्ञांना मिळणार मोठा दिलासा
एका वर्षाच्या आत देशात कायम राहण्याची परवानगी
शिक्षणाबरोबरच कौशल्यही आवश्यक
 

 
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रा(आय टी सेक्टर) तील तब्बल दोन लाख नोकर्‍यांसाठी जपानने आपले दरवाजे उघडले आहेत! एकीकडे अमेरिकेने भारतीय आयटी तज्ञांना नोकर्‍या देणे जवळपास बंद केलेले असतांना जपानचा हा देकार त्यांना सुखावणारा आहे. एवढेच नव्हे तर येत्या २०३० पर्यंत आठ लाख भारतीयांना या क्षेत्रात नोकर्‍या देण्याची तयारीही जपानने दर्शविली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे संशोधन हे फक्त चार भिंतींपुरते मर्यादित न ठेवता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदतही त्यासाठी घेण्याची गरज जपानला भासू लागलेली आहे.
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या निवडणुकीतील दिलेल्या ‘अमेरिका फर्स्ट’ या घोषणेची तंतोतंत अंमलबजावणी सुरु केलेली आहे. तिचाच एक भाग म्हणून त्यांनी एच१बी व्हिसा नियम कडक केले आहेत. त्याचा फटका अनेक भारतीय आयटी तज्ञांना बसलेला आहे. त्यांना या देशातील नोकर्‍या गमावण्याची वेळ आलेली आहे. फक्त गरजेपुरत्या अतिकुशल व उच्च शिक्षण घेतलेल्या तंत्रज्ञांनाच काय ते अमेरिकेत ठेवून इतरांची हकालपट्टी करायची अशी योजनाही ट्रंप यांनी आखलेली आहे. त्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांपुढे पेंच पडलेला आहे.
 
 
अशातच जपानने भारतीय आयटी तज्ञांना सामावून घेण्याची तयारी दर्शविल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जपान आपली अतिप्रगत माहिती तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याच्या प्रयत्नातील एक भागीदार म्हणून भारताला संधी देण्याच्या विचारात आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जपान आपल्या उत्पादन प्रक्रियेत मोठी क्रांती घडवून आणणार आहे. ही प्रक्रिया लाईफ सायन्सेस, फायनान्स, सेवा व कृषी क्षेत्रासाठी असेल.
 
 
याअंतर्गत जपान अतिकुशल आयटी तज्ञांना एका वर्षाच्या आत आपल्या देशात कायम स्वरुपी स्थायिक राहण्याची परवानगीही देणार आहे. सध्या तर अशा मल्टीपल व्हिसासाठी अर्ज करणार्‍यांना त्यांचे नोकरी प्रमाणपत्र (एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट) सादर करण्याची आवश्यकताही काढून टाकण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर जी व्यक्ती एका वर्षापूर्वी जपानमध्ये दोनदा आलेली असेल तिला या देशात प्रवेश करण्यासाठी फक्त पासपोर्ट व व्हिसा अर्ज सादर करावा लागेल.
 
 
भारतात प्रतिवर्षी दहा लाख अभियांत्रिकी पदवीधारक (इंजिनिअरींग ग्रॅज्युएट्स) तयार होतात. पण योग्य त्या कौशल्याअभावी त्यांना नोकर्‍या मिळणे अवघड होत आहे. पण वस्तुस्थिती ही आहे की, नव्या तंत्रज्ञानामुळे नोकर्‍यांच्या विपुल संधी असून कुशल तज्ञांची कमतरता उद्योगांना जाणवत आहे. त्यामुळे गरज आणि कौशल्य यांच्यातील दरी रुंदावत आहे.
 
 
चार वर्षांपूर्वी ही कमतरता ६ टक्के इतकी होती. ती आता १२ टक्के एवढी झालेली आहे. तज्ञांच्या मते यावर लवकरात लवकर काम सुरु व्हावयास हवे. सर्वात जास्त आवश्यकता नेतृत्व पातळी(लीडरशीप लेव्हल)वरील अधिक पुनर्कौशल्य व प्रशिक्षण(रीस्किलिंग व ट्रेनिंग) यांची आहे. टीम लिडरच प्रशिक्षित असल्यास तो आपल्याबरोबर इतरांनाही प्रशिक्षित करु शकतो.
 
 
याबरोबरच उद्योगांनी ही गोष्ट लक्षात घेणे जरुरीचे आहे की, कुशल मनुष्यबळ ही काही एका दिवसाची गोष्ट नसते. यादृष्टिने सरकारची भूमिका महत्वाची आहे. सरकारने जर लवकर नियमावली तयार केली तर उद्योगांसाठी ते सहाय्यभूत होईल.
 
 
तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्यां(फ्रेशर्स)ना त्यांच्या शिक्षणाबरोबरीने आत्मविश्वासही मिळाला पाहिजे. यासाठी अभ्यासक्रमातही योग्य ते बदल करुन ते नवीन तंत्रज्ञानास उपयुक्त ठरतील अशी व्यवस्था करावी लागणार आहे. तसेच थोड्या प्रशिक्षणानंतरही नोकरी मिळू शकेल.
 
 
यावरुन केवळ पुस्तकी शिक्षण हे जीवनात उपयुक्त ठरत नाही तर त्याबरोबर व्यवहारज्ञानही महत्वाचे आहे. इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेल्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसल्याने त्यांना तो मिळण्यासाठी प्रत्यक्ष कर्मभूमी वर धाव घ्यावी लागणार आहे. तिथे काय चालते याची माहितीही मिळवावी लागणार आहे.
 
 
चीनमधून आयात केल्या जाणार्‍या पोलाद व ऍल्युमिनीअम वर प्रचंड कर लादण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केली आहे. जगातील पोलादाचे निम्मे उत्पादन चीनमध्ये होत असल्याने त्यांच्या प्रत्येक धोरण चालीचा परिणाम जागतिक पातळीवर होत असतो. या दोन्ही धातूंचा देशात प्रमाणाबाहेर पुरवठा केला जात असल्याने आमच्या व्यवसायावर विपरीतपरिणाम होत असल्याची तक्रार अमेरिकन कंपन्यांनी केली होती. त्यानंतर चीनने आपल्या देशातील कारखाने बंद करुन १० लाख कामगारांच्या ‘हातावर नारळ दिला’ होता.
 
 

शेअर बाजाराने घेतली मोठी उसळी ! - दोन्ही निर्देशांकात वाढ शेअर बाजाराने आज सोमवारी मोठी उसळी घेतली असून त्याचे सेन्सेक्स व निफ्टी हे दोन्ही निर्देशांक वाढले आहेत. सेन्सेक्सने गेल्या शुक्रवारच्या बंद ३३ हजार ३०७ बिंदूंवरुन आज सकाळी ३३ हजार ४६८ बिंदूंवर उघडून ३३ हजार ९६२ बिंदूंची तर निफ्टीने बंद १० हजार २२६ बिंदूंंवरुन आज १० हजार ३०१ बिंदूंवर उघडून १० हजार ४३३ बिंदूंची उच्च पातळी गाठली होती. दिवसअखेरीस सेन्सेक्स व निफ्टी हे अनुक्रमे ३३ हजार ९१७ व १० हजार ४२१ बिंदूंवर बंद झाले.

 
 
@@AUTHORINFO_V1@@