शेतमालाच्या निर्यातीसाठी शेतकरी आणि निर्यात कंपनीत करार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018
Total Views |



अकोला : अकोल्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्तम भाव मिळावा तसेच जिल्ह्यातील दर्जेदार उत्पादनाची जिल्ह्याबाहेर देखील निर्यात व्हावी, या उद्देशाने अकोला जिल्हा प्रशासनाच्या मध्यस्थीने शेतकरी आणि निर्णयात कंपनी यांच्यात काल करार करण्यात आला आहे. त्यामुळे आता अकोला जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला जिल्ह्या बाहेर देखील निर्यात होणार आहे. 

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काल रात्री हा करार करण्यात आला. यावेळी कृषी अधिकारी अनिल बोंडे, तहसिलदार रवि काळे, रामेश्वर पुरी, कृषी तज्ज्ञ निवृत्ती पाटील, ईवा कंपनीचे संचालक संदेश धुमाळ, ॲग्रो स्टारचे अजय क्षीरसागर यांच्यासह शेतमाल उत्पादक शेतकरी याठिकाणी उपस्थित होते.

'भाजीपाला निर्यात कराराच्या माध्यमातून जिल्हयातील शेतकऱ्यांना एक मोठी संधी मिळाली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, शेतकऱ्यांनी दर्जेदार तथा निर्यातक्षम मालाचे उत्पादन करुन प्रगती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले. तसेच अकोला जिल्ह्यात यापुर्वी केळी निर्यात सुरु झाली आहे. आता भाजीपाला निर्यातीच्या दृष्टीने मोठे पाऊल पडले आहे, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता मागे राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


दरम्यान या नव्या करारानुसार जिल्हयातील शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला प्रामुख्याने भेंडी, कारले, दूधीभोपळा आणि मिरची निर्यात होणार आहे. कालच्या करार हा भेंडीच्या निर्यातीच्या दृष्टीने करार संपन्न झाला. ५५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून साधारणतः ५० एकरात ही निर्यातक्षम भेंडी पिकवणार आहेत. या भेंडीला कंपनीकडून सरासरी २२ रुपये किलोला दर निश्चित करण्यात आला. जिल्ह्यातून दररोज २५ क्विंटल भेंडी निर्यात होईल. निर्यातक्षम भेंडी पिकवण्यासाठी ॲग्रोस्टार कंपनी तांत्रिक मार्गदर्शन व निविष्ठा पुरविणार आहे.


@@AUTHORINFO_V1@@