जळगाव जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी 66 उमेदवारांची दांडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2018
Total Views |
 
 
जळगाव जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी 66 उमेदवारांची दांडी
जळगाव, 12 मार्च
जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे 122 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया 12 मार्च पासून सुरू करण्यात आली आहे.
पहिल्या दिवशी भरतीला 500 उमेदवारांना निमंत्रित करण्यात आले होते. यातील 434 उमेदवारांनी उपस्थिती दिली होती तर 66 उमेदवार गैरहजर राहिले.434 उमेदवारांपैकी 12 उमेदवार उंची व छाती मोजमाप मध्ये अपात्र ठरले. या 422 उमेदवारांची 100 मीटर धावणे, लांबउडी, गोळाफेक, पुलअप्स या मैदानी चाचण्या पुर्ण करण्यात आल्या. या उमेदवारांची 1600 मीटर धावण्याची चाचणी आज 13 रोजी घेण्यात येणार आहे. तसेच मंगळवार रोजी 800 उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
 
 
मंगळवारी सकाळी 4.30 वा. पोलीस स्केटींग ग्राऊंड येथे मैदानी चाचणीसाठी प्रवेशपत्र, आवेदन अर्ज , अलीकडील काळातील पासपोर्ट साईज फोटो आणि उमेदवारांची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असलेले ओळखपत्र आणि आवश्यक मुळ कागदपत्रे आणि छायांकितप्रत आणणे आवश्यक आहे.
@@AUTHORINFO_V1@@