नंदुरबार शहरासाठी विकास कामांना निधी साठी मुख्यमंत्र्याना साकळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2018
Total Views |
 
नंदुरबार शहरासाठी विकास कामांना निधी साठी मुख्यमंत्र्याना साकळे
नंदुरबार -  देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देऊन नंदुरबार शहरा साठी विशेष नीधी ची मागणी करण्यात आली. या प्रसनगी खासदार डॉ.हिनाताई गावित, आ.डाॅ.विजयकुमार गावीत, आ.शीरीष चौधरी,  ओ बी सी मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, उद्दोजक प्रा.डॉ. रवींद्र चौधरी, विरोधी पक्ष नेता चारूदत कळवणकर,आनंद बाबुराव माळी, गौरव चौधरी,प्रशांत चौधरी,नीलेश पाडवी, नीलेश माळी,संतोष वसईकर, लक्ष्मण माळी, कल्पना चौधरी, संगीता सोनवणे,अँड.धनराज गवळी, प्रकाश चौधरी, संजय शहा,नरेंद्र माळी,गजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
. नवनाथ नगर व मोठा मारुती मंदिर परिसरातुन गटाराचे पाणी रोज प्रचंड प्रमाणात वाहून शहराच्या मुख्य बाजारपेठत रोज घाण पाण्याने भरली जाते या समस्येवर अद्यावत भूमिगत गटार रस्ते व विदूत खांब या साठी सर्वेक्षण करून निधी मंजूर करावा. शहरात वाढत्या रहदारी च्या समस्येवर अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.स्वामी समर्थ मंदिरा जवळ बगिच्यासाठी निधी मिळावा.भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने हजारो घरे शहरात आहे त्यांना दंड व शुल्क आकारून भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी आदेश द्यावा. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या प्रभाग क्र. 1,9,11,14,16,17,18 या प्रभागात विकास कामासाठी दहा लाखाचा निधी मिळावा.  शहरात सी.सी.टीव्ही साठी जिल्हा नियोजन समिति मार्फत मंजूर निधीत अजून निधी द्यावा.. प्रभाग क्र. 18 साठी विशेष निधी मागणी करण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@