ऑटो रिक्षा चालकांना अल्पदरात घरे देण्याच्या मागणीची लवकरच पूर्तता करणार - सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या घोषणेबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार
 
 
चंद्रपूर : ऑटो रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांच्या निराकरणाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची प्रलंबित मागणी मी पूर्ण करू शकलो याचा मला मनापासून आनंद आहे. आजवर ऑटो रिक्षा चालकांच्या अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी मी प्रयत्नांची शर्थ केली. ऑटो रिक्षा चालकांना अतिशय कमी दरात म्हाडाच्या माध्यमातून घरे देण्याच्या मागणीचा शासन गंभीरपणे विचार करत असून ही मागणीसुध्दा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
 
 
चंद्रपूर येथे ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे आयोजित सत्कार समारंभात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्प सादर करताना केल्याबद्दल संघटनेतर्फे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे राजेंद्र खांडेकर, हरिष पवार, भारत लहामगे, राजू पडगेलवार, अब्बास भाई, बाळू उपलेंचीवार, बंटी मालेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
 
 
यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, ऑटो रिक्षा चालकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपण नेहमीच संघटनेसोबत राहिले आहोत. पूर्वीच्या सरकारने ऑटो रिक्षा चालकांच्या वाहन करात मोठी वाढ केली होती. विधानसभेच्या माध्यमातून संघर्ष करून ही वाढ कमी करत पुढील दहा वर्षे वाहन करात कोणतीही वाढ होणार नाही असे आश्वासन आपण सरकारकडून घेतले.  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@