बाबरी मशिदीचा काय संबंध?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2018
Total Views |



 
 

झळकले कम्युनिस्ट गदर पार्टी ऑफ इंडियाचे मुखपत्र


मुंबई: सात दिवस पायपीट करत आझाद मैदानात येऊन थडकलेल्या शेतकरी मोर्चाशी बाबरी मशिदीचा नेमका संबंध काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्याच्या नावावर लाल बावट्याखाली एकत्र जमलेल्या लोकांना कम्युनिस्ट गदर पार्टी ऑफ इंडियाने आपल्या मुखपत्राच्या प्रती वाटल्या. ज्यात चक्क बाबरी मशिदीच्या विध्वंसाविरोधात दिल्लीत केलेल्या निदर्शनांची माहिती होती. यात सरकारनेच बाबरी मशिदीचा विध्वंस केल्याचा, सरकारनेच दंगली पेटवल्याचा सरळसरळ आरोप करण्यात आला. दिल्लीत बाबरी मशिदीच्या विध्वंसाचा विरोध करणार्‍यांत कोणाकोणाचा सहभाग होता? तर यात कम्युनिस्ट गदर पार्टी ऑफ इंडियाचा सहभाग होताच पण दक्षिणेतील मुस्लीम कट्टरतावादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि याच संघटनेची राजकीय शाखा असलेल्या सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचाही समावेश होता. या दोन्ही संघटना मुस्लीम कट्टरपंथी असून या संघटनांमार्फत हिंदू तरुणींवर संमोहनाचा वापर करून इस्लाममध्ये धर्मांतरित केले जात असल्याचा आरोप नुकताच एनआयएनेही केला आहे.

 
अशा संघटनांच्या मुखपत्रांचे शेतकर्‍यांच्या नावाखाली सुरू असलेल्या आंदोलनात नेमके काय काम?, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. या संघटनांना इथेही आपला कट्टरतावाद पसरवायचा होता का? बाबरी मशिदीच्या नावाखाली समाजात अशांतता निर्माण करण्याचा त्यांचा काही डाव होता का? समस्याग्रस्त वनवासी जनतेच्या नावावर या लोकांना आपल्या स्वार्थी राजकारणाच्या पोळ्या शेकायच्या आहेत का? असे अनेक प्रश्न कम्युनिस्ट गदर पार्टी ऑफ इंडियाने वाटलेल्या पत्रकांमुळे उपस्थित झाले आहेत. आजचा मोर्चा हा मुख्यतः शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठीचाच होता, त्यातही शेतकर्‍यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आणि वनखात्याच्या जमिनी कसणार्‍या वनवासींची संख्याच मोठी अशी स्थिती होती. मग अशा समाजगटाच्या मागण्यांसंबंधांतील पत्रके जर शेतकर्‍यांचा कैवार घेणार्‍यांनी वाटली असती तर नक्कीच त्यांचा शेतकर्‍यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले असते. परंतु इथे शेतकरी, शेतमजूर, ज्यांच्या नावावर जमीनही नाही, त्यामुळे कर्जही न मिळालेले लोक जिथे जमलेत तिथे धर्माधर्मात तेढ निर्माण करणारी पत्रके या लोकांनी वाटली. हे जेवढे धक्कादायक तेवढेच राज्यातील सामाजिक सलोखा बिघडविणारे, समाजाच्या घट्ट विणीला उसवणारे आणि एकसंध समाजात आग लावणारेच कृत्य समजले पाहिजे. कम्युनिस्ट गदर पार्टी ऑफ इंडियाला या माध्यमातून शेतमजूर, वनवासी, शेतकर्‍यांना तर बदनामकरायचे नाही ना? राज्यातील अन्य समाजघटकांच्या मनात शेतकर्‍यांप्रति अविश्वासाची भावना निर्माण करण्याचा तर हा कावा नाही ना? शेतकर्‍यांच्या आडून या कट्टरतावादी संघटनांना समाजात आपल्याबद्दल सहानुभूती तर निर्माण करायची नाही ना? असेही प्रश्न निर्माण झाले आहेत. यांची उत्तरे कम्युनिस्ट पत्र, त्यांचे पाठीराखे देणार का?
@@AUTHORINFO_V1@@