कार्ती चिदंबरम यांना २४ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2018
Total Views |
 
 
 
 

 
 
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र आणि आयएनएक्स मीडिया कंपनीसंबंधी भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले कार्ती चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत आता पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. २४ मार्चपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
 
 
कार्ती चिदंबरम यांना अटक केल्यावर पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र न्यायालयात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडून कार्ती चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती आणि ही मागणी न्यायालयाने मान्य केली होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत २४ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
 
 
 
कार्ती चिदंबरम यांच्यावर बऱ्याच महिन्यांपासून कारवाई सुरु होती मात्र या प्रकरणाच्या चौकशीत सीबीआयला त्यांनी सहयोग न केल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. ब्रिटनमधील अघोषित संपत्तीबाबत आयकर विभागाला माहिती द्यावी अशी नोटीस आयकर विभागाकडून त्यांना बजावण्यात आली होती. तसेच त्यांच्या विरोधात सीबीआयने तपासणी नोटीस देखील जारी केली होता. मात्र कार्ती चिदंबरम् यांनी कसलीही परवा न करता आपले काम सुरु ठेवले होते यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. 
@@AUTHORINFO_V1@@