मुक्ताईनगर वनक्षेत्रात 39 गावठी बॉम्ब नष्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2018
Total Views |
 
 
मुक्ताईनगर वनक्षेत्रात 39 गावठी बॉम्ब नष्ट
 
जळगाव, 12 मार्च
वन परिक्षेत्र वडोदा ता. मुक्ताईनगर , जि.जळगाव यांच्याकडील वन गुन्हा क्र. 01/2018 मधील जप्त गावठी बॉम्ब नग 39 हे डिफयुज व नष्ट करणे बाबत न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , मुक्ताईनगर यांचे आदेशानुसार बॉम्ब शोधक व नाशक पथकास आवश्यक साधन सामुग्रीसह योग्य ती कारवाई करण्यासाठी मदत मिळावी यासाठी कळविले होते.
 
 
.त्यानुसार 12 रोजी पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ईश्वर सोनवणे, पोलीस हवलदार प्रदिप बडगुजर, पो.कॉ.जुबेर शेख, पो.कॉ. रेवानंद साळुंखे, पो.कॉ.विनोद सुर्यवंशी, अझर मिर्झा, चालक विजय भोंबे, यांनी वनक्षेत्र डोलारखेडा ता.मुक्ताईनगर येथील जंगलात निर्मनुष्य जागी गावठी हात बॉम्ब 39 पैकी 4 गावठी बॉम्ब बीडीडीएस कार्यप्रणालीनुसार डिफयुज केले व सदर बॉम्ब मधील स्फोटके व अवशेष तज्ञांना पाठविणे कामी वेगवेगळे नमुने काढून दिलेले आहे. 35 गावठी बॉम्ब हे बीडीडीएसच्या कार्यप्रणाली नुसार नाश करण्यात आले.
 
 
 
हे गावठी बॉम्ब शिकारीचे वेळी वन्य प्राण्यांना खाण्याचा मोह व्हावा या करीता अशा गावठी बॉम्ब वर चरबी लावतात जेणे करून ती वन्य प्राण्यांनी तोंउात घेवून ती चावली असता त्या गावठी बॉम्बचा स्फोट होवून वन्य प्राण्याच्या शरीराची छिन्न विछीन्न तुकडे होवून तो दगावला जातो.
 
@@AUTHORINFO_V1@@