शिवसेनेकडून कृषी विभागाची प्रेतयात्रा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2018
Total Views |



वाशीम : शेतकरी समस्यांवर सरकार आणि कृषी विभाग कसल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याच्या आरोपावरून वाशीम शिवसेनेकडून काल कृषीविभागाची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढण्यात आली. शिवसेनेचे वाशिम जिल्हाप्रमुख राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे माजी जि.प. सदस्य डॉ. सुभाष राठोड व उपजिल्हाप्रमुख दिनेश राठोड यांच्यासह अनेक जण या यात्रेमध्ये सहभागी झाले होते.
 
 
कृषी विभागाच्या दुर्लक्षामूळेच जिल्ह्यात बीटी बियाणांची लागवड शेतकऱ्यांनी केली. परिणामी कपाशीवर गुलाबी बोंडअळी पडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. तरी देखील कृषी विभाग हातावर हात ठेवून गप्प बसून होता. शेवटी हिवाळी अधिवेशात शिवसेनेच्या आंदोलनामूळे कृषी मंत्रालयाने बोंडअळीने नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे करून कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरिता हेक्टरी तीस हजार व ओलीत करिता सदोतीस हजार नुकसान भरपाई जाहीर केली. परंतु यामध्ये देखील चुकीचे निकष लावून संपूर्ण मानोरा तालुका प्रशासनाने वंचित ठेवल्याचा आरोप शिवसेनेनी यावेळी केला. तसेच शासनाने जाहीर केल्या कर्जमाफीचा मोबदला अजून देखील शेतकऱ्यांना मिळाला नसून कर्जमाफी आणि गारपिटीसची नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी करत, मनोरा तहसीलदारांना या विषयी निवेदन देण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@