त्रिपुरातील ऐतिहासिक विजयाचे रहस्य उलगडणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2018
Total Views |
 
 
 
पुणे : त्रिपुरामध्ये नुकत्याच झालेल्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचे शिल्पकार सुनील देवधर यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विवेक व्यासपीठ, सावरकर अध्यासन केंद्र आणि माय होम इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
हा कार्यक्रम सोमवार दि. १२ मार्च रोजी दुपारी ४ वाजता महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात सुनील देवधर यांचा जाहीर सत्कार होणार आहे. तसेच यानंतर त्रिपुरामधील ऐतिहासिक विजयासंदर्भात देवधर यांचे जाहीर व्याख्यानही होणार आहे. पुण्याचे माजी खासदार व सध्या नॅशनल शिपिंग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष प्रदीप रावत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@