किसान मोर्चाची ठाण्यामध्ये धडक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2018
Total Views |

तब्बल ३० हजार शेतकरी मोर्चात सहभागी

शिवसेना-मनसेचा पाठिंबा




ठाणे :
शेतकरी प्रश्नांवरून राज्य सरकारला घराण्याच्या उद्देशाने डाव्या पक्षांकडून सुरु करण्यात आलेला किसान मोर्चा आज मुंबईच्या वेशीवर अर्थात ठाण्यामध्ये येऊन पोहोचला आहे. तब्बल ३० हजार शेतकऱ्यांचा सहभाग असलेला हा 'लाल' सागर आज विद्याविहारमध्ये मुक्काम करणार असून उद्या सकाळी ६ वाजता विधानभवनाकडे रवाना होणार आहे.
नाशिकहून निघालेला हा मोर्चा आज पहाटेच्या सुमार ठाण्यामध्ये दाखल झाला. मोर्चात मोठ्या संख्याने सामील झालेल्या मोर्चेकरांनी पहाटे ठाण्यातच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. यानंतर थोडा वेळ याठिकाणी विश्रामकडून आणि न्याहारीकरून हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. यानंतर आजचा संपुर्ण मुक्काम विद्याविहार येथे होणार असून उद्या पहाटेचे मोर्चा विधानभवनाकडे जाणार आहे. या दरम्यान विधानभवनाला चारी बाजूने घेराव घालून आपल्या समस्या सरकार दरबारी मांडण्याचा निर्धार सर्व शेतकऱ्यांनी केला आहे.


राज ठाकरे घेणार भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज या मोर्चाचे ठाण्यामध्ये स्वागत करणार असून मोर्चाच्या प्रतिनिधींची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. किसान मोर्चा ठाण्यामध्ये दाखल झाल्यानंतरच येथील स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी मोर्चातील प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसेच राज ठाकरे यांच्या फोन वरून संपर्क देखील करून दिला. या दरम्यान शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मनसे शेतकऱ्यांसह असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
शिवसेनेचा देखील पाठिंबा
मनसेच्या पाठींब्यानंतर शिवसेनेनी देखील या 'लाल' मोर्चाला आपला पाठिंबा दिला आहे. राज्य सरकारने गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांची फक्त फसवणूक केली असून शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना कायम उभी आहे, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. ठाकरे यांच्या सुचनेनुसार ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मोर्चेकरांची भेट घेतील असून पाठिंब्याचे आश्वासन दिले आहे.
 
वाहतुकीत बदल होण्याची शक्यता  
 
मोठ्या संख्याने शेतकरी उद्या पहाटे विधानभवनाकडे रवाना होणार असल्यामुळे उद्या मुंबईतील वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत उद्या सोमवार असल्यामुळे सकाळी नोकरदार वर्गांची कामावर जाण्याची घाई असणार आहे, त्या दरम्यान हा मोर्चा रस्त्यावर उतरल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून वाहतूक विभागाकडून वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहेत.  
@@AUTHORINFO_V1@@