राममंदिरासाठी होणारे प्रयत्न स्वागतार्ह : भैय्याजी जोशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2018
Total Views |


नागपूर :
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला राममंदिराच्या प्रश्नावर आता समाजामध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली असून राममंदिरासाठी सध्या होत असलेले प्रयत्न हे अत्यंत स्वागतार्ह आहेत, असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले आहे. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आज ते बोलत होते. यावेळी संघाचा आतापर्यंतचा प्रवास आणि सध्या समाजात सूरु असलेल्या काही घटनांचा त्यांनी उहापोह केला.


'अयोध्यातील रामजन्म भूमीवर राममंदिरच होणार यात कसल्याही प्रकारची शंका नाही. परंतु यासाठी सध्या सुरु असलेल्या त्या एका प्रक्रियेमधून जाणे अत्यंत गरजेचे आहे. न्यायालयाने आपला निकाल जाहीर केल्यानंतर मंदिर निर्मितीचे काम तातडीने सुरु होईल, असे ते म्हणाले. तसेच राममंदिर निर्मितीवर जनसामन्यांची सहमती बनवणे हे अत्यंत कठीण कार्य असून त्यासाठी सध्या देशभरात अनेकजण प्रयत्न करत आहेत. राममंदिरावर होणार चर्चा आणि त्यातून येणारा सकारात्मक प्रतिसाद हा अत्यंत प्रेरणादायी असा आहे. त्यामुळे राममंदिरासाठी होणारे सर्व प्रयत्न स्वागतार्ह आहेत, असे ते म्हणाले.


नागपूर येथे गेल्या तीन दिवसांपासून संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधींची बैठक सुरु आहे. या बैठकीमध्ये संघाच्या महत्त्वांच्या पदांवर गेल्या दोन दिवसांमध्ये काही नव्या मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भैय्याजी जोशी यांची देखील संघाच्या सरकार्यवाहपदी चौथ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. या फेरनिवडणुकीनंतर भैय्याजी यांनी पत्रकारपरिषदेतून आपले मत सर्वासमोर मांडले.

भैय्याजी जोशी यांची संपुर्ण पत्रकार परिषद :

@@AUTHORINFO_V1@@