महिला पोलीस व कुटुंबांनी महिला दिनाला घेतले लिंगविभिन्नतेचे धडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2018
Total Views |
 

 
 
 
 
मुंबई :महिला दिनी केवळ स्त्रियांच्या समस्यांवर चर्चा करणे पुरेसे नसते. महिला वर्गाच्या प्रगतीची मूळं त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचलेली असतात. ही मूळं भक्कम असली तर स्त्री आणि पर्यायाने कुटुंब प्रगतीच्या पथावर धावू शकते. त्यातही पोलीस कुटुंबांच्या कथा आणि व्यथा इतरांहून वेगळ्या असतात. हे लक्षात घेऊन कोहिनूर समूहाने महिला दिनानिमित्त ‘खाकीचे साथी’ हा खास महिला पोलीस व त्यांच्या कुटुंबियांसाठी समाजोपयोगी उपक्रम आयोजित केला होता, ज्यात सुमारे २५० हून अधिक पोलिसांच्याकुटुंबियांनी सहभाग घेतला. सोबत सामाजिक कार्यकर्ते हरीश सदानी, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. अंजली तळवलकर आणि कोहिनूर समूहाचे उपाध्यक्ष अतुल मोडक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात 'जेंडर बेंडर' या पथनाट्याने झाली. हिंसेच्या विरोधात चळवळ करणाऱ्या पुरुषांची संघटना म्हणजेच मेन अगेन्स्ट वायोलेन्स अँड अब्युज अर्थात 'मावा' तर्फे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे पथनाट्य सादर केले. यामध्ये अभिनयाच्या माध्यमातून मुलांनी स्त्रीत्व आणि पुरुषपणाच्या पारंपरिक संकल्पना, नव्या पिढीचे त्याबद्दलचे विचार शिवाय तृतीयपंथीय, समलिंगी व्यक्ती, अपंग व्यक्ती अशी लिंगविभिन्नता आणि त्यातील नैसर्गिकता यांवरही भाष्य केले. याला जोडून मावाचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते हरीश सदानी यांनी पथनाट्याच्या संदर्भाने स्त्री-पुरूष संवेदना या व्यापक विषयावर प्रेक्षकांशी मनमोकळा संवाद साधला. पथनाट्य आणि एकूणच संवाद प्रेक्षकांना अंतर्मुख करून गेला.
 
 
कोहिनूरचे उपाध्यक्ष अतुल मोडक पोलिस कुटुंबांशी संवाद साधताना म्हणाले की, “यावेळचा महिला दिन तुमच्यासोबत साजरा करण्याचे ठरवले त्यामागे कारण आहे. जगाचा व्यवहा ररथ व्यवस्थित चालायला हवा तर रथाची दोन्ही चाकं समान उंचीवर असावी लागतात. त्यामुळे आम्ही स्त्री-पुरुष समानतेला प्राधान्य देतो. त्यामुळे निव्वळ महिला सक्षमीकरण पुरेसे नाही, तर या प्रक्रियेत पुसरुषांनाही सोबत घ्यावे लागेल. म्हणूनच असा कार्यक्रम आयोजित केला. तसेही आमचे आणि पोलिसांचे खूप जुने घट्ट नाते आहे. पोलीस, वाहतूक पोलीस, रेल्वे पोलीस अशा विविध यंत्रणांना सोबत घेऊन आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. पोलीस यंत्रणेबद्दल आम्हाला खूप आदर आहे आणि तो व्यक्त करण्याचा हा एक मार्ग वाटतो.”
 

 
 
 
कोहिनूर रुग्णालयाच्या स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अंजली यांनी सर्व्हायकल कॅन्सर, स्तनाचा कर्करोग तसेच महिलांमधील इतर कर्करोगाबद्दल सादरीकरणाद्वारे विस्तृत माहिती दिली आणि कर्करोगाला घाबरण्यापेक्षा योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाय केल्यास निम्मा आजार तिथेच बारा होता हे प्रेक्षकांच्या मनावर प्रभावीपणे रुजवले. त्यानंतर कोहिनूरच्या प्रतिनिधी अर्चना ढवळे आणि पॉलोमी बोन्द्रे यांनी पोलीस कुटुंबांच्या नव्या पिढीच्या दृष्टीने विभिन्न करिअर वाटांबद्दल थोडक्यात मार्गदर्शन केले. यानंतर सर्व उपस्थित महिला पोलीसांनी आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला आणि अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
@@AUTHORINFO_V1@@