हरीपूरा धरणातुन हडकाई नदीपात्रात पाणी सोडले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2018
Total Views |
 
 
हरीपूरा धरणातुन हडकाई नदीपात्रात पाणी सोडले
 
 यावल  १० मार्च 
तालुक्यातील हरीपूरा, मोहराळा, कोरपावली,महेलखेडी,परिसरात भूजल  पाणी पातळी खालावल्याने हरीपुरा धरणातून हडकाई नदिपात्रात पाणी सोडण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली होती. त्या मागणी नुसार  शनिवार  १० रोजी दुपारी १२ वाजता सावदा स्वामीनारायण गुरुकलचे भक्त्तीस्वरूपदासजी ' भंडारी स्वामी व भुसावळ लघु पाटबंधारे विभागाचे प्रभारी उपअभियंता आर.एम.महाजन यांच्या हस्ते हरीपुरा धरणावर पाणीपुजन करून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.
 
हरीपूरा,मोहराळा,कोरपावली, महेलखेडी,परिसरात भुर्गभातील पाण्याची पातळी खालवल्याने परिसरातील शेतकरी वर्गाने पाणी सोडण्याची मागणी केली होती.  जलसंपदामंत्री  ना .  गिरीष महाजन,आ हरीभाऊ जावळे,आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या सुचनेनुसार धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.
धरणातील पाणी नदीत सोडावे यासाठी यावल कृउबा संचालक राकेश फेगडे,महेलखेडी सरपंच विलास भागवत पाटील, मोहराळा विकासो चेअरमन जनार्दन पाटील व गावाचे सरपंच यांनी प्रयत्न केले.  सन 2००९पासुन धरणाचे काम बंदच आहे शासनाने सांडव्याचे कामासाठी निधीच दिलेला नाही. सांडव्याचे बांधकाम त्वरीत पूर्ण करावे व धरणाची पाण्याची पातळी वाढवुन व धरणावर जाण्यासाठी पुलाचे बांधकाम त्वरीत करावे यासाठी निधी उपलब्ध करून द्यावां  जेणेकरून  परिसरातील भूगर्भातील पातळी वाढीस मदत होईल अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@