निम्न तापी पाडळसे प्रकल्पास २३५७.56 कोटी निधीस राज्य वित्त विभागाची मान्यता--आ शिरीष चौधरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2018
Total Views |
 
निम्न तापी पाडळसे प्रकल्पास २३५७.56 कोटी निधीस राज्य वित्त विभागाची मान्यता--आ शिरीष चौधरी
 
मान्यतेचा प्रस्ताव केंद्राकडे वर्ग,पहिल्या टप्प्यात लवकरच होणार भारघोस निधीची घोषणा,पाच सिचंन योजनाही लागणार मार्गी
अमळनेर -
तालुक्यातील निम्न तापी पाडळसे प्रकल्पास राज्य वित्त विभागाने २३५७.५६ कोटी निधीस मान्यता दिली असून हा प्रस्ताव आता केंद्रीय जल आयोगाकडे वर्ग झाला आहे,यामुळे लवकरच केंद्राकडून पहिल्या टप्प्यात भरघोस निधी उपलब्द होऊन धरणाचा प्रश्न कायमचा सुटेल असा विश्वास आ. शिरीष चौधरी यांनी व्यक्त करून यासाठी विशेष सहकार्य करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत.
राज्य वित्त आयोगाने मान्यता दिलेल्या २३५७.५६ कोटी निधीतून धारणासह तालुक्यातील पाचही अद्यावत उपसा सिंचन योजना मार्गी लागणार असून तृतीय सुधारित मान्यतेनुसार धरणासाठी ११५७.७४ कोटी तर उपसा सिंचन योजनांसाठी ६२१ कोटी निधी खर्च केला जाणार असल्याचेही आ चौधरी यांनी यात म्हटले आहे.अमळनेर तालुक्यासह परिसरातील तालुक्यांसाठी नवसंजीवनी ठरणारे पाडलसे धरण पूर्णत्वास आणावे यासाठी आ चौधरी यांनी सुर्वतीपासूनच प्रयत्न सुरु केले होते परंतु यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने केवळ राज्याच्या मदतीने हे धरण पूर्ण होणार नाही हे निदर्शनास आल्याने आ चौधरी यांनी केंद्रीय जल आयोगाकडे पाठपुरावा सुरु केला,त्या अनुषंगाने 9 जून 2016 रोजी मान्यतेसंदर्भात केंद्रीय जल आयोगास पत्र दिले,यानंतर तांत्रिक दोष पूर्ण करण्यासाठी तापी पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता आर जी पाटील व अधिकाऱ्यांची बैठक घेतली यात राज्य वित्त आंयोगाच्या मान्यतेसंदर्भात प्राथमिक चर्चा होऊन यासंदर्भात वित्त मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांना आ चौधरी यांनी निवेदन दिले,वित्त मंत्र्यांचा निर्देशानंतर वित्त विभागाचे अति मुख्य सचिव जैन यांच्याशीही चर्चा झाल्यानंतर जैन यांनी राज्याचे डेप्युटी सेक्रेटरी यांना हा प्रस्ताव दिला यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार वित्त विभागाने या प्रस्तावास मान्यता देऊन हा प्रस्ताव केंद्रीय जल आयोगाचे सेक्रेटरी यांचेकडे वर्ग केला आहे.
आ .चौधरींचे वित्त मंत्र्यांना निवेदन
आ .चौधरी यांनी वित्त मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात निम्न तापी प्रकल्प, पाडळसे हा जळगाव जिल्ह्यातील अवर्षणप्रवण क्षेत्रास लाभ देणारा महत्वपूर्ण पाटबंधारे प्रकल्प असून. तापी नदीवरील हे धरण निश्चितपणे भरणारे आहे,मात्र धरण अपूर्ण असल्याने महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरात राज्याला विनावापर वाहून जात आहे. दरम्यानच्या काळात भाव वाढीमुळे पाच शासकीय उपसा योजनांची 621.28 कोटी किंमत धरून केंदीय जल आयोगाने सन 2015-16 दर सुचीनुसार धरणासाठी रु 2357.56 कोटी किंमत मान्य केली आहे. सद्यस्थितीत प्रकल्पावर 395 कोटी सुमारे 35 टक्के खर्च झालेला आहे. सदर प्रकल्पाचे काम सुमारे 20 वर्षांपासून मंदगतीने सुरू आहे. सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे, प्रकल्पाची मोठी किंमत पाहता केंदीय अर्थ सहाय्य मिळाल्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होणार नाही. केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळणेसाठी वित्त विभागांची सहमती आवश्यक आहे.
 
 
सुप्रमा प्रस्ताव तयार करणे व मान्यता देणे याला काही कालावधी लागणार असून सद्यस्थितीत केंद्र शासनाने तत्वता मान्य केलेल्या अद्यावत किमतीस वित्त विभागाची समंती मिळाल्यास केंद्रीय अर्थ सहाय्य प्राप्त होण्याच्या मार्ग मोकळा होईल. महाराष्ट्रामध्ये यापूर्वीही सुधारीत किमतीस सुप्रमा मिळण्याआधीच काही प्रकल्पांना वित्त विभागांची सहमती मिळाली आहे, याच धर्तीवर निम्न तापी प्रकल्पास 2357.56 कोटी रकमेस वित्त विभागाची सहमती मिळावी अशी मागणी त्यांनीं केली होती.
 
 
यासंदर्भात सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे वित्त विभागाने यास मान्यता दिली असून यापुढे धरणासाठी संपूर्ण निधी केंद्र शासनाच देईल व आता कोणत्याही परिस्थितीत अतिशय कमी कालावधीत हे धरण पूर्णत्वास येऊन अमळनेर तालुका व परिसर सुजलाम सुफलाम होईल असा विश्वास आ शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@