स्वच्छ भारतासाठी विविध योजना तर आरोग्य सुविधांसाठी मोठी तरतूद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2018
Total Views |

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८- १९

 
 
 
 
मुंबई : स्वच्छ भारतासाठी विविध पातळ्यांवर विविध उपाय योजना केल्या जात असताना महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८- १९ मध्येही स्वच्छ भारतासाठी विविध योजना राबवण्यात येणार आहेत, तसेच आरोग्य सुविधांसाठीही अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे.
 
स्वच्छ भारत  
 
Ø स्वच्छ भारत अभियानासाठी १ हजार ५२६ कोटी निधी.
Ø मुख्यमंत्री ग्रामीण सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन प्रकल्प ही नवीन योजना, ३३५ कोटी निधीची तरतूद.
Ø अमृत योजनेसाठी २ हजार ३१० कोटी रुपयांची तरतूद.
Ø स्मार्ट सिटी अभियान : ८ शहरांसाठी १ हजार ३१६ कोटी निधी.
Ø सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानासाठी ९०० कोटी निधीची तरतूद.
 
आरोग्य सुविधांसाठी मोठी तरतूद
Ø राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी ९६४ कोटी निधीची तरतूद.
Ø महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अभियानासाठी ५७६ कोटी निधी.
Ø सिंधूदुर्ग जिल्ह्यामध्ये अंदाजे २० कोटी किमतीचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय स्थापणार.
Ø हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेसाठी ३ कोटी ५० लाखांचा निधी.
Ø संकटग्रस्त महिलांसाठी ‘स्वाधार गृहे’ ही योजना, २० कोटी निधीची तरतूद.
Ø आदिवासी क्षेत्रातील जिल्ह्यांसाठी ग्राम बाल विकास केंद्र योजना सुरू करणार, २१ कोटी १९ लक्ष निधीची तरतूद.
 
@@AUTHORINFO_V1@@