भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्याचे स्थलांतरण होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2018
Total Views |
 

 
 
भुसावळ : 
भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्याचे स्थलांतरण होण्याचे निश्चीत झाले असून विद्यमान ठिकाणी रेल्वेचे जुने इंजिन ठेवण्यात येणार आहे.
 
 
लोहमार्ग पोलीस ठाण्याचे भुसावळ ठाणे आणि या ठाण्या अंतर्गत जळगाव आउटपोस्ट आहे. लोहमार्ग पोलीस ठाणे असलेली जागा रेल्वेच्या मालकीची आहे. भुसावळ विभागात मुंबई रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण होत आहे. चौथ्या रेल्वे लाईनला मंजुरी मिळाली आहे. रेल्वे गाडयांची वाढती संख्या पाहता रेल्वे स्थानकात २ नवीन फलाट तयार केले जाणार आहेत. त्या अनुषंगाने रेल्वेला जागेची गरज भासली आहे.
 
 
या कामासाठी रेल्वे प्रशासन त्यांची जागा वापरात आणार आहे. लोहमार्ग पोलीस ठाणे स्थलांतरीत होवून रेल्वेच्या जुने पार्सल कार्यालयाकडे स्थलांतरीत होणार आहे. ही प्रक्रिया येत्या ४ ते ५ महिन्यात पूर्ण होणार आहे. रेल्व स्थानकात मंजूर झालेले दोन सरकते जीने लवकरच कार्यान्वीत होणार आहे. यातील एका सरकत्या जिन्याजवळ लोहमार्ग पोलीस ठाणे स्थलांतरीत होत आहे. प्रवाशांची वाढती संख्या व आधुनिकिकरणाची कास धरल्याने रेल्वे प्रशासन आणखी दोन सरकते जीने निर्माण करणार आहे.
जेथे भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाणे आहे. त्या ठिकाणी रेल्वेचे पुरातन इंजिन ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या दर्शनीभागाला अधिक चांगले स्वरुप प्राप्त होणार आहे. यापूर्वी रेल्वेचे जुने इंजिन डीआरएम कार्यालय आणि रेल्वे स्थानकाच्या उत्तर भागात ठेवण्यात आले आहे. स्थानकाच्या दक्षिण भागात रेल्वेचे जुने इंजिन ठेवल्याने स्थानकाच्या शोभेत भर पडणार आहे.
 
 
नवीन फलाटांवर ‘बेटी बचाओ बेटी पढाओे’ च्या डॉल ठेवण्यात येणार आहे. स्थानकची शोभा वाढविणे आणि जन प्रबोधन करणे ही कामे रेल्वे प्रशासन सहज हाताळत आहे.
 
 

रेल्वेच्या विकासासाठी स्थानिकांचे सहकार्य लाभत आहे. रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण होत आहे. त्यात लोहमार्ग पोलीस ठाणे स्थलांंतरीत होणार आहे. विकास अधिक गतीने व्हावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.                      -  एम.एस.तोमर, वरिष्ठ अभियंता, डीआरएम कार्यालय

 
 
@@AUTHORINFO_V1@@