पुढचा महापौर भाजपचाच : ना. गिरीश महाजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2018
Total Views |

 
जळगाव : 
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचाच महापौर निवडून आणायचा असून, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही पक्षाच्या यशाची पुनरावृत्ती झाली पाहिजे. पुढील शिक्षक आमदार हा भाजपचा राहिला पाहिजे, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पक्ष पदाधिकार्‍यांच्या बैठकीत बोलताना केले.
 
 
भाजप जिल्हा ग्रामीण व जळगाव महानगरची बैठक जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आ. सुरेश भोळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली. यावेळी मार्गदर्शन करताना ना. गिरीश महाजन बोलत होते.  निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
 
 
विभाग संघटनमंत्री ऍड. किशोर काळकर यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक कामाचा आढावा घेतला. उदय वाघ यांनी जळगाव जिल्हा हा कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनामुक्त करण्याचा संकल्प केला. नुकत्याच झालेल्या ग्रा. पं. निवडणुकीत सगळ्यात जास्त भाजपचे लोकनियुक्त सरपंच व सदस्य निवडून आल्याबद्दल त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले.
 
 
आ. सुरेश भोळे यांनी जळगाव मनपाच्या आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मकदृष्ट्या सज्ज आहोत, असे सांगितले. प्रदेश चिटणीस आ. स्मिता वाघ, उज्ज्वला पाटील, खासदार ए. टी. नाना पाटील, आ. चंदूभाई पटेल, जि.प.सभापती प्रभाकर आप्पा सोनवणे, मनपातील विरोधी पक्षनेते वामनदादा खडके यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@