खासदार चव्हाण यांनी मांडला कांद्याच्या भावामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2018
Total Views |

कांद्याचे आतरराष्ट्रीय धोरण ठरवण्याची विनंती

 
 
 
 
 
नाशिक : उन्हाळी अधिवेशनात पहिल्याच सप्ताहात दिंडोरी लोकसभेचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी कांद्याच्या भावात चढ व उतार होत असल्याने शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे याबद्दल लोकसभेत ३७७ च्या अधिसूचनेनुसार मुद्दा मांडला.
 
मुद्दा मांडताना चव्हाण म्हणाले की,‘’ कांद्याच्या उत्पादनात दिंडोरी लोकसभेचा मोठा वाटा असतो. मागील काही वर्षात नाशिक जिल्ह्यामध्ये अनियमित पावसामुळे कांद्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. कांद्याचे उत्पादन कमी झाले. कांद्याचे भाव वाढले पण या वाढलेल्या भावाचा शेतकर्‍यांना फायदा झाला नाही. तो फायदा व्यापार्‍यांना झाला. हवामानाचा कांदा उत्पादनावर मोठा परिणाम होतो पण त्याचबरोबर सरकारच्या कांदा निर्यात मूल्यधोरणाचा मोठा परिणाम शेतकर्‍यांच्या रोजीरोटीवर होतो. कांद्याचे निर्यात मूल्य धोरण योग्य नसल्यामुळे शेतकर्‍यांना कांद्याचा योग्य मोबदला मिळत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात असून सुद्धा शेतकर्‍यांना त्याचा फायदा मिळत नाही. आपले कांदा निर्यात मूल्य ७७० अमेरिकन डॉलर प्रती टन निश्चित आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचा कांदा महाग आहे. साहजिकच भारतीय कांद्याचा भाव वाढलेला असतो. त्यामुळे भारतीय कांद्याची मागणी कमी होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर कांदा बाजारपेठेवर पाकिस्तान, चीन, मिस्र, इराण देशांचा कब्जा होतो. दुसरीकडे भारतीय शेतकर्‍यांना योग्य किंमत मिळत तर नाहीच याचा परिणाम भारतात हजारो टन कांदा सडून जातो. त्यामुळे भारताला महसूलाचे नुकसान होते.’’
 
खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोक सभेत सरकारला विनंती केली की, ‘‘ कांद्याचे आंतरराष्ट्रीय निर्यात धोरण ठरवण्याची योग्य वेळ आली असून, निर्यात मूल्य शून्य ठेऊन भारतीय शेतकर्‍यांचे आंतरराष्ट्रीय बाजारातील लाभ कमावू शकतील. भारत सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त कांदा विकून विदेशी मुद्रा मिळवेल.’’ असेही ते म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@